Pune Crime: आंबेगावात दरोडेखोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्याची हत्या

थोरांदळे येथे घरफोडीसह हल्ला; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, पोलिस तपास सुरू
 Murder
MurderPudhari
Published on
Updated on

मंचर: आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत दामोदर जयराम मिंडे (वय 62) या शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 31) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 Murder
Ujani Flamingo Decline: उजनीत फ्लेमिंगोची घट; पर्यावरणीय ऱ्हासाचे संकेत

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी नीलेश टेमगिरे हनुमान मंदिराच्या कामानिमित्त मंदिराचे विश्वस्त दामोदर मिंडे यांच्या घरी गेले असता त्यांना मिंडे रक्तबंबाळ स्थितीत मृत झाल्याचे आढळले. त्यांच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आला होता. त्यांनी सरपंच जे. डी. टेमगिरे, उपसरपंच संदीप टेमगिरे, पोलिस पाटील वैशाली टेमगिरे, संजय टेमगिरे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी पोलिसांना याबाबत कळविले. मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत दामोदर मिंडे यांची विवाहित मुलगी गीतल सतीश गावडे यांनी मंचर ठाण्यात फिर्यात दिली आहे.

 Murder
Pune Kondhwa Garbage Problem: कोंढव्यात कचऱ्याचा विळखा; कौसरबाग रस्ता डंपिंग ग्राउंडसारखा

फिर्यादीत म्हटले आहे की, वडील दामोदर मिंडे हे घरात एकटेच झोपले असताना दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर घरातील साहित्याची उचकापाचक करून काही वस्तू घराबाहेरील झाडाखाली टाकल्या. या घटनेनंतर चोरट्यांनी राधू बबन विश्वासराव यांच्या घरासमोर बांधलेला बैल सोडून लोखंडी खुंटी चोरली. घरातील सदस्यांना दरोडेखोरांच्या हालचालीची चाहूल लागताच त्यांनी आरडाओरडा केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन संशयित कैद झाले आहेत.

 Murder
Rajarshi Shahu Scholarship UNSW Excluded: राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजनेतून UNSW विद्यापीठ वगळले

त्यानंतर दरोडेखोरांनी लक्ष्मण बबन विश्वासराव यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून घरातील साहित्याची उचकापाचक केली. त्यांची मुले मुंबईला असल्यामुळे नेमके काय चोरीला गेले हे समजू शकले नाही. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथून अर्धा किलोमीटरवर असलेले शेतकरी विलास नारायण टेमगिरे यांचे बंद घराचा दरवाजा पहारीने तोडण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. पहारीचा आवाज झाल्याने पडवीत झोपलेले विलास टेमगिरे जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केला असता चोरटे पळून गेले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना याची माहिती दिली.

 Murder
Pune District Cricket Association Controversy: पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन सभेत वॉकआऊट; एजीएम वादात

अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, मंचरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक सनिल धनवे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. आरोपींचा लवकरच शोध लागेल, असे उपविभागीय अधिकारी मांडवे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news