Ajit Pawar Padma Vibhushan: अजित पवारांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ देण्याची मागणी; आमदार विक्रम काकडेंचे अमित शहांना निवेदन

महाराष्ट्राच्या विकासातील चार दशकांच्या योगदानाचा दाखला; केंद्र सरकारने सहानुभूतीने विचार करण्याचे आवाहन
Amit Shah And Vikram Kakade
Amit Shah And Vikram KakadePudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान पाहता त्यांना 'मरणोत्तर पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

Amit Shah And Vikram Kakade
Pune Waste Processing Project: पुणे महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात १२८ कोटींची बचत; निविदा दरात मोठी कपात

आमदार काकडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या विकासात गेली चार दशके स्व. अजित पवार यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. आमदार, खासदार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्या बरोबरच अजित पवार यांनी अर्थ व नियोजन, जलसंधारण, ऊर्जा, ग्रामीण विकास, कृषी आदी अनेक महत्त्वपूर्ण विभागांत अमूल्य योगदान दिले आहे.

Amit Shah And Vikram Kakade
Pune HCMTR Project: पुणे एचसीएमटीआर प्रकल्पाला वेग; १३ हजार कोटींच्या कामासाठी निविदापूर्व हालचाली सुरू

स्व. पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही अनेक लोककल्याण कारी उपक्रम व प्रकल्प राबविले गेले आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे कायमच ते चर्चेत राहिले. याच कारणास्तव त्यांना जनतेचे प्रचंड प्रेम मिळाले.

Amit Shah And Vikram Kakade
Pune PMC Land Compensation: देवाची उरुळी-फुरसुंगी कचरा डेपो जमीन मोबदला प्रकरण; दोषी अधिकाऱ्यांची चौकशी होणार

त्यांचे योगदान येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे. स्व. अजित पवार यांचे कार्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांना 'मरणोत्तर पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित करावे. केंद्र सरकारने या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी विनंती आमदार काकडे यांनी गृहमंत्री शहा यांच्याबरोबरील भेटीदरम्यान केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news