पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडे?

पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडे?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता पुण्याचे पालकमंत्रिपद येण्याची शक्यता आहे. असे झाले तर एका दादांकडून पुन्हा दुसर्‍या दादांकडे पालकमंत्री पदाची सूत्रे येतील. काँग्रेस- राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी यांच्या सरकारच्या काळात पुण्याचा पालकमंत्रिपदाची सूत्रे अजित पवार यांच्याकडेच होती.

राज्यात शिवसेना – भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी आली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचाही समावेश झाल्याने पुण्याची जबाबदारी त्यांच्याच हाती सोपविली जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. तर विद्यमान पालकमंत्री पाटील यांच्याकडे पुन्हा कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी येऊ शकते असेही सांगण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news