बीड : कार-दुचाकीच्या भीषण अपघातात २ प्राध्यापकांचा मृत्‍यू | पुढारी

बीड : कार-दुचाकीच्या भीषण अपघातात २ प्राध्यापकांचा मृत्‍यू

बीड, पुढारी वृत्तसेवा शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील म्हसोबा फाट्यावर आज (सोमवार) सकाळी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात शिरूर येथील कालिकादेवी महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याचे कळते. अपघात एवढा भीषण होता की, कार आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर दुचाकीला आग लागून ती जळून खाक झाली.

प्रा. शहादेव शिवाजी डोंगर (वय 50, रा.जाट नांदूर) आणि अंकूश साहेबराव गव्हाणे (वय 48) अशी मृत प्राध्यापकांची नावे आहेत. ते शिरूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात कार्यरत होते. सोमवारी (दि.३) सकाळी बीड येथून दुचाकीवरून शिरूर कडे जात असताना नगर रोडवरील बीपीएड कॉलेज जवळील पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला कारने (क्र.एम एच 14/ जेई 5372) जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने दोघांचे मृतदेह जळल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button