Ajit Pawar : अजित पवारांचं गुरुपौर्णिमेनिमित्तच ट्वीट आणि नेटीझन्सनी पाडला खोचक कमेंट्सचा पाऊस | पुढारी

Ajit Pawar : अजित पवारांचं गुरुपौर्णिमेनिमित्तच ट्वीट आणि नेटीझन्सनी पाडला खोचक कमेंट्सचा पाऊस

पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रातील सत्तानाट्याचे सूत्रधार ठरलेले अजित पवार यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर  छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. अजित पवारांच्या या निर्णयाबाबत राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. शपथविधीनंतर अजित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीवर दावा केला.

या सगळ्या गोंधळात चर्चेत आहे ते अजित पवार यांचं गुरुपौर्णिमेनिमित्तचं ट्वीट. पवारांनी हे ट्वीट करताच नेटीझन्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दादांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ‘दादा तुमचे नक्की गुरु कोण? फडणवीस की सोमैय्या ?’ असा खोचक सवालही अनेकजण विचारताना दिसत आहेत. अजितदादा आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात,

‘ आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येणाऱ्या, व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणाऱ्या, स्वप्नांच्या पंखांना बळ देणाऱ्या आणि एक आदर्श नागरिक आपण बनावं म्हणून आपल्यामध्ये सदाचारी विचारांची रुजवण करणाऱ्या तमाम गुरुजनांना ‘गुरुपौर्णिमा’निमित्त कोटी-कोटी प्रणाम! सर्वांना ‘गुरुपौर्णिमा’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!’

यावर नेटीझन्सनी खोचक कमेंट्स केल्या आहेत..

 

Back to top button