एआयसीटीईचे आता सायकल चॅलेंज ; पारितोषिक जिंकण्याची संधी

एआयसीटीईचे आता सायकल चॅलेंज ; पारितोषिक जिंकण्याची संधी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भारतीय बाजारपेठेला पूरक, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सायकल तयार करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) भारत सायकल डिझाइन चॅलेंज ही स्पर्धा आयोजित केली असून, देशभरातील तंत्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी होणार्‍या या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सायकलनिर्मितीसाठी पारितोषिके दिली जाणार आहेत. एआयसीटीईने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पना आणि सर्जनशीलतेला चालना देणे, शाश्वत वाहतुकीचा प्रचार करण्यासह देशभरातील विविध वयोगटांतील नागरिकांना येणार्‍या समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी भारत सायकल डिझाइन चॅलेंज ही स्पर्धा आयोजित केल्याचे एआयसीटीईने स्पष्ट केले आहे.

विद्युत (इलेक्ट्रिक) किंवा सर्वसाधारण या दोन गटांत सायकलनिर्मिती करण्याचे आव्हान देण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तीन ते पाच जणांचा चमू आवश्यक आहे. संकल्पना नोंदणीसाठी 13 जुलैची मुदत आहे. 1 ऑगस्टला प्रारूप सादरीकरण करावे लागेल. चाचणी आणि मूल्यमापन 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत होईल. 2 ऑक्टोबरला अंतिम फेरीतील सायकलचे सादरीकरण होईल. सर्वोत्कृष्ट 16 संघांना प्रारूपनिर्मितीसाठी 40 हजारांचा निधी दिला जाईल. विजेत्या संघांना एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धेबाबत अधिक माहिती www.aicte-india.org या संकेतस्थळावर दिली आहे.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news