AI for Agriculture 2026: मुंबईत ‘एआय फॉर ॲग्री 2026’ जागतिक परिषद; शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा नवा युगारंभ

22-23 फेब्रुवारीला जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये महाकुंभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
AI
AIPudhari
Published on
Updated on

पुणे: जगात शेती आता केवळ ट्रॅक्टर आणि नांगरापुरती मर्यादित राहिलेली नसून ती आता उपग््राह (सॅटेलाईट) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात प्रवेश करत आहे. या बदलाचे नेतृत्व करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून येत्या 22 आणि 23 फेबुवारी 2026 रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (बीकेसी) येथे ‌‘एआय फॉर ॲग््राि 2026‌’ या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

AI
Pune Flower Exhibition 2026: पुण्यात 44 वे भव्य पुष्पप्रदर्शन सुरू; 266 विभागांत आकर्षक फुलांची मेजवानी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन रविवारी (दि.22) सकाळी साडे अकरा वाजता होणार असून यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले असल्याने, या परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. या परिषदेत जागतिक बँक (वर्ल्ड बँक), आशियाई विकास बँक (एडीबी) आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या (यूएन) नामांकित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, शेतकऱ्यांचे नशीब बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा हा महाकुंभ ठरणार असल्याचे कृषि आयुक्तालयातून कळविण्यात आले आहे.

AI
Daund Bike Accident: दौंड तालुक्यात आयशर टेम्पोची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी

या परिषदेत धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. त्यामध्ये उद्घाटन कार्यक्रमास इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि आधार कार्डचे जनक नंदन निलेकणी, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर, आशियाई विकास बँकेंचे संचालक ताकेशी उएदा, एच. टी. पारेख फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक एस. पारेख, केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव देवेश चतुर्वेदी, एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सौम्या स्वामीनाथन, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मुख्य सल्लागार श्री. जे. सत्यनारायण, युनायटेड नेशन्स वुमनचे देशातील प्रतिनिधी कांता सिंह, इंडिया एआय मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग, युनायटेड नेशन्स वुमनचे देशातील प्रतिनिधी कांता सिंह, सह्याद्री फार्म्स अध्यक्ष विलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

AI
PMRDA New Roads Project: पुणे जिल्ह्यात चार तालुक्यांत पीएमआरडीएकडून १० नवे रस्ते उभारणार

बऱ्याचदा एआय आणि तंत्रज्ञान हे शब्द शेतकऱ्यांपासून दूरचे वाटते. ही दरी कमी करण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम बुध्दिमत्ता म्हणजे एआय आणि ॲग््रािटेक इनोव्हेशन सेंटरची (एआयएआयसी) स्थापना केली आहे. हे केंद्र प्रामुख्याने राज्य सरकारच्या महाॲग््राी-एआय पॉलिसी 2025-2029 अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे.

AI
Pune Metro New Entry Gates: पुणे मेट्रोच्या गजबजलेल्या स्थानकांवर नवीन प्रवेशद्वार सुरु

यासाठी शासनाने 500 कोटी रुपयांची तरतूद केली असून, शेतीला एआयचलित डिजिटल युगात नेणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. शेतकरी, विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषी उद्योजकांसाठी ही परिषद एक पर्वणीच आहे. खालील लिंकवर त्वरित नोंदणी करा: नोंदणी लिंक: ुुु.रळ4रसीळ. ारहरीरीहीींर. र्सेीं.ळप या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन कृषि आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news