Pune Metro New Entry Gates: पुणे मेट्रोच्या गजबजलेल्या स्थानकांवर नवीन प्रवेशद्वार सुरु

प्रवाशांचा वेळ वाचवणारे आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणारे पिंपरी, शिवाजीनगर व स्वारगेट प्रवेशद्वार
Pune Metro New Entry Gates
Pune Metro New Entry GatesPudhari
Published on
Updated on

पुणे: महामेट्रोने ‌‘व्हॅलेंटाइन डे‌’चे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट या तीन अत्यंत गजबजलेल्या मेट्रो स्थानकांची अतिरिक्त प्रवेशद्वारे शनिवारपासून (दि. 14) प्रवाशांसाठी खुली केली. या खुल्या झालेल्या प्रवेशद्वारांमुळे मेट्रो प्रवाशांचा प्रवास सोपा झाला आहे. या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता जीवघेणी वाहतूक कोंडी आणि रस्ते ओलांडण्याच्या कसरतीतून सुटका मिळणार आहे.

Pune Metro New Entry Gates
Pune Stray Dogs Court Safety: ‘सुप्रीम‌’ आदेशाची जिल्हा न्यायालयात पायमल्ली

पुणे-मुंबई महामार्गावर मुंबईच्या दिशेला असलेले पिंपरी-चिंचवड मनपा (प्रवेशद्वार क्र. 3) प्रवेशद्वार खुले झाल्यामुळे पिंपरी शहरातून येणाऱ्या प्रवाशांना आता हायवे ओलांडण्याची गरज राहिली नाही. महापालिकेत जाणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे. तसेच स्वारगेट मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र. 5) भुयारी प्रवेशद्वार थेट एसटी स्टँडच्या बाजूला उघडले आहे.

Pune Metro New Entry Gates
Pune Stray Dogs: पुण्यात भटक्या श्वानांचा वाढता धोका

यामुळे एसटी प्रवासी आता गर्दीत न अडकता थेट या भुयारी प्रवेशद्वाराने स्वारगेट मेट्रो स्थानकात जात आहेत. परिणामी, एसटी प्रवाशांना थेट मेट्रो प्रवासासाठी जाणे सोपे झाले आहे. आकाशवाणी केंद्राजवळ (शिमला ऑफिस चौक) येथील हे भुयारी (शिवाजीनगर मेट्रो स्थानक प्रवेशद्वार क्र. 3) प्रवेशद्वार सुरू झाल्याने गणेशखिंड रस्ता आणि कृषी महाविद्यालयाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. शनिवारपासून पुणेकर मेट्रो प्रवाशांनी या तिन्ही मेट्रो स्थानकांतून प्रवास केला.

मेट्रो प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आम्ही ही नवीन प्रवेशद्वारे सुरू करीत आहोत. यामुळे विशेषत: मुख्य रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्ते ओलांडण्याचा त्रास होणार नाही आणि त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.

श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news