Daund Bike Accident: दौंड तालुक्यात आयशर टेम्पोची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी

पांढरेवाडी हद्दीत भीषण अपघात; टेम्पोचालकावर गुन्हा दाखल
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

कुरकुंभ: पांढरेवाडी (ता. दौंड) हद्दीत आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागुन जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एक ठार, तर एकजण जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि. १४) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला.

Accident
Pune Metro New Entry Gates: पुणे मेट्रोच्या गजबजलेल्या स्थानकांवर नवीन प्रवेशद्वार सुरु

याप्रकरणी आयशर टेम्पोचालक चंद्रकांत आसराजी शेंबडे (रा. धाखंटा, ता. गेवराई, जि. बीड) याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वप्नील दत्तात्रय सुतार (वय २१, रा. मळद, ता. दौड) यांनी फिर्याद दिली आहे. भरत संतोष जाधव( रा. मळद, ता. दौड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

Accident
Pune Stray Dogs Court Safety: ‘सुप्रीम‌’ आदेशाची जिल्हा न्यायालयात पायमल्ली

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरेवाडी हद्दीतील (मुकादमवाडी) इटरनेस प्रा. लि. कंपनीचे पाठीमागील सेवा रस्त्यावर फिर्यादी व भरत जाधव दोघे दुचाकी नंबर (एमएच ४२ बीआर ९८४१) या वाहनाने मळदकडे जात होते. यादरम्यान भरधाव वेगातील आयशर (एमएच १० ईजे ९१११) टेम्पोने दुचाकीला पाठीमागुन जबर धडक दिल्याने अपघात झाला. यात भरत जाधव यांच्या डोक्याला, पोटावर, हातापायाला गंभीर व किरकोळ दुखापत होवुन त्याचा मृत्यू झाला. स्वप्नील सुतार यांना किरकोळ दुखापत झाली, तसेच दुचाकीचे नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news