

वाल्हे : आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथील विकास मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी ‘यशदा’अंतर्गत राज्यातील विविध भागांतील 40 गटविकास अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. 24) पाहणी दौरा केला.
या पाहणी दौऱ्याची सुरुवात गावातील रस्ते व पायाभूत सुविधांपासून झाली. अधिकाऱ्यांनी गावांतर्गत रस्ते, पाणंद रस्ते तसेच जलसंधारणाची कामे पाहत त्याची उपयुक्तता जाणून घेतली. त्यानंतर ग््राामपंचायत इमारत, प्राथमिक शाळा अंगणवाडी, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्था, स्मशानभूमी विकास आणि व्यायामशाळा या सुविधांची पाहणी करण्यात आली.
आबालवृद्धांसाठी उभारण्यात आलेल्या नाना-नानी पार्क, ‘बोलक्या भिंती’ या उपक्रमाने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. दरम्यान, या पाहणी दौऱ्यात विविध भागांतील गटविकास अधिकाऱ्यांनी गावात प्रत्यक्ष फेरफटका मारत विविध विकासकामांची पाहणी केली.
दरम्यान, आडाचीवाडी येथील रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व ग््राामस्थांचे सहकार्य व प्रशासनाची साथ यामुळेच आडाचीवाडीचा विकास शक्य झाल्याचे, सरपंच सुवर्णा बजरंग पवार यांनी सांगितले.
या वेळी, रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, उपसरपंच मोहन पवार, सूर्यकांत पवार, माजी उपसरपंच अलका पवार, शकुंतला पवार, सूरज पवार, दिलीप पवार, अमित शिर्के, अरविंद पवार, प्रशांत पवार, सामाजिक कार्यकर्ते बजरंग पवार, सागर पवार, अभिजित पवार आदींसह ग््राामस्थ उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांनी येथील पुणे जिल्ह्यातील पहिल्या इस्रायल तंत्रज्ञानावर आधारित बायोगॅस प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली. या प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीबरोबरच कचरा व्यवस्थापनासही हातभार लागल्याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. या वेळी प्रत्येक ठिकाणी थांबून गटविकास अधिकाऱ्यांनी कामांची अंमलबजावणी कशी करण्यात आली. निधीचा योग्य वापर कसा केला गेला आणि ग््राामस्थांचा सहभाग कसा मिळवण्यात आला, याबाबत माहिती घेतली.
आडाचीवाडी येथील रहिवाशांनी विकासासाठी दाखवलेली एकजूट व येथील रहिवाशी व रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेली प्रशासनाची भक्कम साथ यामुळे आडाचीवाडी गाव विकासाच्या दिशेने ठोसपणे पुढे गेले आहे. ग््राामपंचायतीने राबवलेले हे विकास मॉडेल इतर गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी असून अशा उपक्रमांचा अभ्यास इतर ठिकाणीही उपयुक्त ठरेल.
बबनराव चखाले, विस्तार अधिकारी पुरंदर