पुणे : प्रयोगशाळांच्या नमुना तपासणी अहवालानंतर कारवाई

पुणे : प्रयोगशाळांच्या नमुना तपासणी अहवालानंतर कारवाई
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अकोल्यामध्ये खासगी व्यक्तीसह धडक कारवाईमुळे वादग्रस्त ठरलेल्या कृषी विभागाच्या कारवाईतील बी-बियाणे, खते, कीटकनाशकांच्या गोदामांवरील धडक कारवाईतील निविष्ठांचे नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासण्यास पाठविण्यात आले आहेत. त्याबाबतचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित करण्यावर शनिवारी (दि.17) झालेल्या कृषी आयुक्तालयातील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर मिळाली. कृषी आयुक्तालयात संचालक (नियंत्रण) विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीस अकोला येथील कारवाईच्या विशेष पथकातील 40 हून अधिक तंत्र अधिकारी व काही जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगामाच्या तोंडावर निविष्ठांमधील भेसळखोरांना रोखण्यासाठी कृषी आयुक्तालयाच्या सूचनांन्वये प्रत्येक जिल्ह्यात धडक तपासणीची मोहीम सुरू आहे. त्यातच गेल्या आठवड्यात अकोला जिल्ह्यात कृषी विभागाकडून काही खासगी व्यक्तींसह करण्यात आलेल्या निविष्ठांच्या गोदामांवरील धडक कारवाईमुळे हा विषय ऐरणीवर आला आणि कृषी मंत्रालयच वादाच्या भोवर्‍यात अडकले. त्यावरून येत्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून कृषीची वादग्रस्त कारवाई 'टार्गेट' होण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार आढावा बैठकीत कारवाईची पडताळणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अकोल्यात 24.54 कोटींच्या निविष्ठांना विक्रीबंद आदेश
अकोला येथे गेल्या आठवड्यात सलग 3 दिवस कृषी विभागाच्या पथकाने बी-बियाणे, खते, कीटकनाशकांच्या 61 गोदामांची तपासणी केली. त्यातून 179 निविष्ठांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर सुमारे 46 कंपन्यांच्या एकूण 24 कोटी 54 लाख 83 हजार रुपये किंमतीच्या निविष्ठांना विक्रीबंद आदेश देण्यात आले असून, पोलिसांमध्ये एका प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिली.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news