पिंपरी: वर्दळीच्या ठिकाणी भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई होणार का?

पिंपरी: वर्दळीच्या ठिकाणी भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई होणार का?

नवी सांगवी (पिंपरी) : पिंपळे गुरव येथील त्रिमूर्ती कॉलनीत खोदकाम करण्यात आलेल्या एका बांधकामाचा राडारोडा ट्रॅक्टरमध्ये भरून चालक मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने जात आहे. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

मुख्य रस्त्यावर दुतर्फा बाजूस देवकर पार्क ते काटे पुरम चौक दरम्यान बाजारपेठ असल्याने सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे मागून येणार्‍या दुचाकी चालकांच्या डोळ्यात धूळ जात असल्यामुळे याचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. सध्या शाळा सुरू असल्याने विद्यार्थी व पालक ये-जा करीत असतात. त्यातच भरधाव वेगाने वर्दळीच्या ठिकाणी चालक ट्रॅक्टर चालवित असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

वर्दळीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वाहतूक पोलिस याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दिवसेंदिवस ट्रॅक्टर चालकांचे फावत चालले आहे. वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news