

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क :वाकड काळा खडक येथे चार चाकी गाडीने सात ते आठ टू व्हीलर आणि एका टेम्पोला धडक दिली असून त्यामुळे भूमकर चौक परिसरात ट्रॅफिक जॅम झाली आहे. या अपघाताची माहिती प्रथम दै. पुढारीने वाकड पोलीस स्टेशनच्या पोलीस हेड एपीआय विकास पंचमुखी यांना दिली असून पोलिस अधिकारी लवकरच घटनास्थळी पोहचण्यासाठी रवाना झाले आहेत.
सकाळची वेळ असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यातही नागरिकांनी आपली वाहने थांबवून जखमींची मदत केली. तर काही नागरिक फोटो काढण्यात मग्न दिसत होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून किरकोळ दुखापत झालेली आहे.
हेही वाचा