

आळेफाटा; पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तरुणाने तिच्या घरातील तब्बल २१ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम देवराम डोंगरे ( वय-२६, रा. चाळकवाडी, पिंपळवंडी, ता.जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी , २४ एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत आरोपी विक्रम डोंगरे याने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच तिला विश्वासात घेत आर्थिक अडचण सांगून तिच्या आजीचे, आईचे व मावशीचे अंदाजे आठ लाख रुपये किमतीचे तब्ब्ल २१ तोळे सोने लंपास केले.
मुलीच्या आजीला घरातील सोन्याचे दागिने दिसले नाहीत. यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत शुक्रवारी ( १० सप्टेंबर) पीडित मुलीने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
त्यानुसार पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विक्रम डोंगरे विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान पोलिसांनी मोठ्या शिताफीने तात्काळ संशयित आरोपीला अटक केली असून, त्याला कोर्टाने तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. बडगुजर तपास करीत आहे.
हेही वाचलं का ?