पुणे : हवेली-3 चे प्रभारी दुय्यम निबंधक अभिजित विधाते निलंबित

पुणे : हवेली-3 चे प्रभारी दुय्यम निबंधक अभिजित विधाते निलंबित
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर येथील दस्तनोंदणी कार्यालय हवेली क्रमांक-3 चे प्रभारी दुय्यम निबंधक तथा वरिष्ठ लिपिक अभिजित विधाते यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचे आदेश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी नुकतेच दिले आहेत. हडपसर येथील हवेली क्रमांक-3 हे दस्तनोंदणी कार्यालय कायमच चर्चेत राहिले आहे.

नियमबाह्य खरेदीखत करणे, यासह शासकीय गैरवर्तन करण्याचा प्रकार या कार्यालयात सुरू होता. याबाबत नागरिकांसह प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार मुद्रांक शुल्क कार्यालयाने अभिजित विधाते यांनी नियम धाब्यावर बसवून चुकीच्या पध्दतीने दस्तनोंदणी केल्याचे केलेल्या सखोल चौकशीत दिसून आले. त्यामुळे विधाते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

महसूलमंत्र्यांनी लक्ष घालावे

तुकडेबंदी, महारेराच्या नियमांचे उल्लंघन झालेल्या तीन वर्षांपासूनच्या दस्तांची तपासणी करण्याचे आदेश नोंदणी महानिरीक्षकांनी काढले आहेत. उच्च स्तरावर तपासण्या सुरू आहेत. परंतु, काही दुय्यम निबंधकांना अधिकार्‍यांकडून वाचविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूलमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news