पुणे: बकोरिया यांची बदली पीएमपीसाठी आघात, आम्ही आंदोलन करणार; आम आदमी पक्षाचा इशारा

पुणे: बकोरिया यांची बदली पीएमपीसाठी आघात, आम्ही आंदोलन करणार; आम आदमी पक्षाचा इशारा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांची बदली कार्यकाळ संपण्याआधीच करणे चुकीचे आहे, त्यापार्श्वभूमीवर आम्ही आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन करणार आहे. तसेच वेळ प्रसंगी यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार आहोत, असे आम आदमी पक्ष वाहतूक आघाडीकडून सांगण्यात आले. पीएमपी अधिकारी बकोरिया यांच्या बदलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून सोमवारी आम आदमीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, वाहतूक आघाडीचे सेनथील अय्यर, कामगार आघाडीचे संजय कोणे, इम्रान खान, साहिल परदेशी व अन्य उपस्थित होते.

यावेळी कुंभार म्हणाले, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, नियुक्तीनंतर अवघ्या नऊ महिन्यांतच त्यांची बदल करत त्यांच्या जागी सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही बदली बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी आहे, तरी बकोरीया यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी. अन्यथा आम आदमी पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. बकोरीया हे धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे पीएमपीएलने चांगला वेग घेतला होता. पुण्यात वाढणाऱ्या रहदारीचा विचार करता डबल डेकर बस आणण्याच्या प्रयत्नात बकोरिया अतिशय नियोजनबद्ध काम करत होते. बकोरिया जवळपास नऊ महिन्यापूर्वी या संस्थेमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी आपल्या कामाची छाप दाखवली होती. अनेक निर्णय त्यांनी अतिशय वेगाने घेत वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम केली होती. त्यामुळे पीएमपीएलचे उत्पन्न देखील वाढले होते. सर्व काम सुरुळीत सुरू असताना त्यांचा कार्यकाल संपण्याआधीच त्यांची अन्यायकारक बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news