क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना सर्वोत्कृष्ट: व्हीएसआयचे पुरस्कार जाहीर | पुढारी

क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना सर्वोत्कृष्ट: व्हीएसआयचे पुरस्कार जाहीर

पुणे, पुढारी वृत्तसेवा: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) आर्थिक वर्ष 2020-21 चे विविध पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. त्यामध्ये कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार सांगली जिल्ह्यातील क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यांस (कुंडल,ता.पलूस) जाहिर झाला आहे. तशी घोषणा व्हीएसआयचे उपाध्यक्ष व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

समीर वानखेडे यांची केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात बदली

क्रांतीअग्रणी साखर कारखान्यांस मानचिन्ह, प्रशिस्तपत्रक व रोख २ लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कै. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर प्रा.लि. (आलेगांव,ता.दौंड), कै. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार सांगली जिल्ह्यातील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यांस (वांगी,ता.कडेगांव), कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार सांगली जिल्ह्यातील उदगिरी शुगर अ‍ॅन्ड पॉवर लि. (बामणी-पारे,ता.खानापूर), कै. किसन महोदव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार सांगली जिल्ह्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यांस, कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार सातारा जिल्ह्यातील शरयु अ‍ॅग्रेा इंडस्ट्रीज लिमिटेड (कापशी-मोतेवाडी,ता.फलटण) या कारखान्यास जाहिर झाला आहे. या सर्व पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख एक लाख रुपये असल्याचे त्यांनी जाहिर केले आहे.

Unemployment Rate : शहरी भागात ९. ३ तर ग्रामीणमध्‍ये ७.३ टक्‍के बेरोजगारी दर

या शिवाय अन्य विविध पुरस्कारही जाहिर झाले आहेत. त्यामध्ये राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार ः कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार- पूर्वहंगाम राज्यात प्रथम – विमल धोंडिराम पवार (वर्णे-सातारा) – 323.45 प्रति हेक्टरी मे.टन. कै. वसंतराव नाईक पुरस्कार – सुरु हंगाम राज्यात प्रथम- विश्वनाथ धोंडिबा होळसंबरे (गुडसर,ता.उदगीर,जि.लातूर) 330.68 मे.टन प्रति हेक्टरी. कै. आण्णासाहेब शिंदे पुरस्कार- सुलोचना मोहनराव कदम (कुंडलवाडी,ता.वाळवा,जि.सांगली) – 277.06 मे.टन प्रति हेक्टरी. रक्कम रुपये दहा हजार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या शिवाय विभागनिहाय ऊस भूषण पुरस्कार आणि वैयक्तिक कारखाना अधिकार्‍यांसाठीचे पुरस्कारही जाहिर झाले आहेत. उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार ः दक्षिण विभाग – सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कराड,जि.सातारा. मध्यविभाग- द्वारकाधीश साखर कारखाना लि. सटाणा,जि.नाशिक. उत्तरपूर्व विभाग- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी,जालना.

EWS reservation : सुनावणी लवकर घेण्याची केंद्राची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार ः

दक्षिण विभाग – जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना. हातकणंगले,जि.कोल्हापूर, मध्य विभाग- द्वारकाधीश साखर कारखाना, सटाणा,जि.नाशिक, उत्तरपूर्व विभाग- नॅचरल शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज, रांजणी कळंब, जि.उस्माणाबाद.मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार ः दक्षिण विभागातील प्रथम पुरस्कार- यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (रेठरे बु,ता.कराड,जि.सातारा). द्वितीय पुरस्कार. डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना (वांगी-कडेगांव,जि.सांगली). तृतीय पुरस्कार. जयवंत शुगर्स लिमिटेड (धावरवाडी-ता.कराड,जि.सातारा)

मध्य विभाग पुरस्कार ः प्रथम पुरस्कार – दौंड शुगर प्रा.लि, आलेगांव, ता.दौंड,जि. पुणे. द्वितीय पुरस्कार- निरा-भिमा सहकारी साखर कारखाना रेडणी,ता.इंदापूर,जि.पुणे. तृतीय पुरस्कार – सहकार महर्षि शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखाना, सहजानंदनगर शिंगणापूर,ता.कोपरगांव,जि.अहमदनगर.

उत्तरपूर्व विभाग पुरस्कारः प्रथम पुरस्कार – कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर-अंबड,जि.जालना. द्वितीय पुरस्कार- बारामती अ‍ॅग्रो लि., महात्मा फुलेनगर-ता.कन्नड,जि.औरंगाबाद. मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढत गेल्‍यास राज्‍यात पुन्‍हा लॉकडाउन करावा लागेल : उपमुख्‍यमंत्री अजित पवार

ऑनलाईन मंगळवारी वार्षिक सभा; पुरस्कार वितरण नंतर होणार

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.4) सकाळी साडेदहा वाजता संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, संस्थेचे विश्वस्त व नियामक मंडळाचे सदस्य, संबंधित विभागाचे अधिकारी, साखर उद्योगातील मान्यवरांचा सहभाग त्यामध्ये राहील. तसेच घोषित पुरस्कारांचे वितरण कोरोना स्थितीमुळे नंतर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान,साखर संकुल येथे व्हीएसआयच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस महासंचालक शिवाजीराव देशमुख, विशेष कार्य अधिकारी संभाजी कडू पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Back to top button