प्रभागरचनेची सॉफ्ट कॉपी 6 जानेवारीला निवडणूक आयोगाकडे सादर करणार | पुढारी

प्रभागरचनेची सॉफ्ट कॉपी 6 जानेवारीला निवडणूक आयोगाकडे सादर करणार

निवडणुका मुदतीमध्ये होण्याची शक्यता

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्रिसदस्यीय 46 प्रभागरचनेच्या कच्च्या आराखड्याचे नकाशे व प्रभागनिहाय माहिती कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी गुरुवारी (दि. 6) सादर करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

का रे दुरावा! विराटचे नाव टाळून गांगुलींकडून टीम इंडियाचे अभिनंदन

त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालिकेने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार कच्चा आराखडा पेनड्राईव्हवर राज्य निवडणूक आयोगास 6 डिसेंबरला सादर केला आहे.

त्यावर आयोगासमोर 11 डिसेंबरला सादरीकरण करण्यात आले. त्याबाबतच्या काही त्रुटींवर 13 डिसेंबरला पुन्हा आयोगासमोर चर्चा झाली. त्यानंतर आयोगाने आराखडा स्वीकारला आहे. आराखड्यात आयोग आपल्या पद्धतीने बदल करू शकतो.

बीड : वृद्ध पतीने कोयत्‍याने सपासप वार करून पत्‍नीला संपवले

आराखडा सादर केल्यानंतर 3 आठवड्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचा कच्चा आराखड्याची सॉफ्ट कॉपी 6 जानेवारीला सादर करणाची सूचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिली आहे. त्यामुळे निवडणूका वेळेत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जानेवारीमध्ये 16 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या संपूर्ण सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर

राज्य निवडणूक आयोगानुसार कार्यवाही सुरू

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता तो सॉफ्ट कॉपीमध्ये तयार करून 6 जानेवारीला दिला जाणार आहे. त्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

 

Back to top button