केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन | पुढारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या रविवारी (१९ डिसेंबर) सकाळी दहा वाजता पुणेकरांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने यांनी दिली आहे.

महापालिकेतील विवध कार्यक्रमांसाठी दाैरा

रासने म्हणाले, पुणे महापालिकेच्या विस्तारीत नवीन इमारतीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण, महापालिका हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमीपूजन आणि शहर भाजपच्या बूथ समितीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा अशा विविध कार्यक्रमांसाठी शाह पुणे भेटीवर येत असून, त्या वेळी ते गणपतीचे दर्शन घेणार आहेत. या पूर्वी दोन वेळा ते सपत्नीक दर्शनाला आले आहेत. पाच वर्षांपूर्वी ५ जून २०१६ रोजी पुणे दौर्यादरम्यान त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले होते.

हेही वाचा

bullock cart races in Maharashtra : सर्वोच्‍च न्‍यायालयाची बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी

पुणे : छायाचित्र प्रदर्शनातून 1971 मधील विजयाच्या आठवणींना उजाळा

पुण्यात महापालिकेसाठी भाजपशी युती नाही : राज ठाकरेंची भूमिका

पुणे शहराला सापडेना सक्षम नेता

Somaiya vs munde : किरीट सोमय्या अंबाजोगाईत, धनंजय मुंडे यांची पोलखोल करणार

 

Back to top button