पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताची हेराफेरी करणार्या डॉ. अजय तावरेने यापूर्वीही आपल्या पदाचा गैरवापर करत विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार केला आहे. याबाबत त्याच्याविरोधात वारंवार तक्रारी केल्या. मात्र, त्यांच्या डोक्यावर राजकीय व्यक्तींचा हात असल्याने कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप ससून रुग्णालय व बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय सफाई कर्मचारी-तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात आरोपी असलेल्या डॉ. तावरेने यापूर्वीही पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हेराफेरी, बेकायदेशीर वैद्यकीय प्रमाणपत्र वाटप, सफाई कर्मचारी वारसा हक्क, अनुकंपतत्व प्रकरणामध्ये नियुक्ती यासारख्या प्रकरणांमध्ये आपल्या पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केला आहे. डॉ. तावरेला कायमस्वरूपी वैद्यकीय सेवेतून काढून टाकावे अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही डॉ. पणीकर यांनी दिला आहे.
हेही वाचा