Pune Police : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे झाला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक | पुढारी

Pune Police : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे झाला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यस्तरीय स्पर्धेची बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी बिनतारी संदेश विभागाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर चतुरशृंगी पोलिस (Pune Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश नवनाथ कारंडे असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, दिनेश कारंडे यांनी बिनतारी संदेश विभागाच्या भरती प्रक्रियेत क्रिडा विभागाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर बनावट प्रमाणपत्रासह कागदपत्रे भरती प्रक्रियेत देऊन शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय दिनेशने शासनाची फसवणूक करून तब्बल पाच वर्षे पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असल्याचे ही तपासात समोर आले आहे. यामुळे त्याच्यावर चतुरशृंगी पोलिस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : कोल्हापूरचा अंध पैलवान गाजवतोय मोठ-मोठी मैदानं 

Back to top button