

कोल्हापूर : संतोष पाटील : mla ruturaj patil : कोल्हापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रथमच निवडणुकीला सामोरे जात विजयश्री खेचून आणणार्या आमदार ऋतुराज पाटील यांनी विकास कामांचा धडाका लावल्याचे चित्र आहे. शहरी आणि ग्रामीण असा दुहेरी तोंडावळा असलेल्या मतदारसंघात कोरोना संसर्गात सामाजिक संस्थांच्या सहभाग, डॉ. डी. वाय.पाटील हॉस्पिटल आणि विकास निधी याचा समन्वय साधत आरोग्य सेवेला महत्त्व दिले. या जोडीला तब्बल 74 कोटी 94 लाख 85 हजार रुपयांच्या निधीतून विकासकामांचे सतेज अभियान राबवले आहे.
प्रथमच आमदार म्हणून ऋतुराज पाटील यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये शपथग्रहण केल्यानंतर चार महिन्यांतच कोरोना महामारीचा सामना करावा लागला. पहिल्या लाटेत आजाराबद्दल यंत्रणेसह सर्वसामान्यही अनभिन्न होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करण्यावर भर दिला.
अनेक सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने मतदारसंघात कोरोना केअर सेंटरची उभारणी केली. संपूर्ण मतदारसंघात मास्क, सॅनिटायझरचे वाटप डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून केले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या सहयोगातून घर टू घर सर्वेक्षण करून आरोग्य विषयक प्रबोधन आणि मदत केली.
2019-20 आणि 2020-21 मध्ये आमदार फंडातून क्रीडांगण विकास तसेच कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय कारणास्तव विशेष निधीची तरतूद केली आहे.
यासाठी 3 कोटी 65 लाख 51 हजार खर्च केले. दलित वस्ती सुधार योजना 2020-21 – 2 कोटी 64 लाखांचा निधी खर्च केला.
2020-21 मध्ये अर्थसंकल्पीय निधीतून 17 कोटी 95 लाख रुपये विकासकामांसाठी मतदारसंघासाठी आणले. 15 व्या वित्त आयोगातून 78 लाख तर वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेतून 31 लाख 34 हजार निधी उपलब्ध केला.
रस्ते विशेष दुरुस्ती योजनेतून 5 कोटी 10 लाखांची कामे केली.
तर ग्रामीण विकास कार्यक्रमातून 10 कोटी रुपयांची विकासकामे केली. कोल्हापूर महापालिकेचे 28 प्रभाग दक्षिण मतदार संघात येतात.
यासाठी महापालिका अंतर्गत निधी 11 कोटी 45 लाख, नगरविकास कार्यक्रम 3 कोटी 50 लाख तर महाराष्ट्र नगरोत्थान योजना 4 कोटी 4 लाख रुपयांचा निधी आणला.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून 5 कोटी 97 लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.
सामाजिक न्याय विभाग 8 कोटी 14 लाख रुपये उपलब्ध केले.
दलित वस्ती सुधार योजनेत 35 लाखांचा निधी मतदारसंघात आणला.
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित रस्ते दुरुस्तीसाठी 1 कोटी 6 लाख रुपयांची कामे केली.
पुढील तीन वर्षांत मतदार संघातील उर्वरित विकास कामे करण्यास आ. ऋतुराज पाटील यांनी भर देणार असल्याचे सांगितले.