सातकरांच्या गाड्याने पटकाविला ‘घाटाचा राजा’ किताब..! | पुढारी

सातकरांच्या गाड्याने पटकाविला ‘घाटाचा राजा’ किताब..!

कडूस : पुढारी वृत्तसेवा : कडूस (ता. खेड) येथील भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत मंगेश रामदास सातकर, सातकर ग्रुप यांच्या जुगलबंदीचा गाडा ‘घाटाचा राजा’ किताबाचा मानकरी ठरला, तर चेअरमन पंडित लक्ष्मण मोढवे, शुभम खळदकर, मैत्री ग्रुप यांच्या गाड्याने फायनल ‘सम्राट’ किताब पटकाविला. भैरवनाथ मंडळ ठाणे, हनुमान तरुण मंडळ शेंडेवाडी ग्रामस्थांनी हारतुरे, मांडव डहाळ्याची मिरवणूक काढत देवाला अर्पण केले. सायंकाळी भैरवनाथ कला नाट्य मंडळ देवतोरणे यांचा भजनी-भारुडाचा कार्यक्रम झाला. दिवंगत अशोक शेंडे कुस्ती संकुलात कुस्त्यांचा आखाडा झाला. रात्री विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला.

शर्यतीत 150 हून अधिक बैलगाडे धावले. प्रथम शंकर ज्ञानेश्वर गारगोटे यांचा गाडा फळीफोड किताबाचा मानकरी ठरला. दुसरा मोन्या किरण साळुंके यांचा गाडा, तिसरा लक्ष्मण सिताराम गोपाळे यांचा गाडा, तर विशाल पारधी यांचा गाडा चौथा आला. फायनल शर्यत विभागून देण्यात आली. प्रथम क्रमांक चेअरमन पंडित लक्ष्मण मोढवे, शुभम खळदकर, मैत्री ग्रुप बैलगाडा संघटना जुगलबंदी व गजानन भिकाजी धायबर, सह्याद्री ग्रुप ढमाले शिवार यांच्या जुगलबंदीच्या गाड्याने पटकवला. दुसरा क्रमांक वैभव दत्तात्रय ढमाले, अक्षय मोढवे, पंचवटी ग्रुप बैलगाडा संघटना व नयन ढमाले, सचिन शिंदे जुगलबंदी व मंगेश सातकर यांच्या गाड्याने पटकाविला. तिसरा क्रमांक ज्ञानेश्वर कुलाठ रामहरी कणसे जातेगाव, कोळोबा बैलगाडा संघटना औंढे यांच्या गाड्याने पटकवला. तर चौथा क्रमांक शंकर गारगोटे, विठ्ठल ढमाले, निवृत्ती नेहेरे यांच्या गाड्याने पटकवला.

सुत्रसंचालन अनिकेत धायबर, कुंडलिक तुपे, उल्हास मुसळे, शिवाजी कावडे, पंकज शिंदे यांनी केले. घड्याळाचे काम अरुण शिंदे, नितिन थिंगळे यांनी पाहिले. तर लेखनीक म्हणून दिलीप ढमाले, रामदास मंडलिक, युवराज बंदावणे यांनी काम पाहिले.
सरपंच शहनाज तुरुक, उपसरपंच रंजना पानमंद, यात्रा कमिटी अध्यक्ष निवृत्ती नेहेरे, अभिनाथ शेंडे, प्रताप ढमाले, आनंदराव पानमंद, मारुती जाधव, अनिल जाधव, शामराव ढमाले, आप्पासाहेब धायबर, पंडित मोढवे, अशोक गारगोटे, नंदकुमार जाधव, भानुदास बंदावणे आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button