कल्याण-नगर महामार्गावर तिहेरी अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही | पुढारी

कल्याण-नगर महामार्गावर तिहेरी अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथील कल्याण – नगर महामार्गावरील एका हॉटेलजवळ रविवारी (दि. 14) दुपारी अडीचच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. यात टेंपोचालक जखमी झाला. या अपघातात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले. आळेफाट्याच्या दिशेकडून ओतूरकडे जाणार्‍या स्कॉर्पिओ (एमएच 14 इवाय 8426) ला ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणार्‍या कार (एमएच 14 बीएक्स 8008)ची धडक झाली.

त्यानंतर कार टेंपो (एम एच 14 डीएम 9008) ला धडकला. यात टेंपोचालक सुरेश तुकाराम शिंदे (रा. आळे, ता. जुन्नर) हे जखमी झाल्याची माहिती मिळाली. त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताचे कारण समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच ओतूरचे पोलिस उपनिरीक्षक अनिल केरूरकर, हवालदार विलास कोंडावळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा

 

Back to top button