धक्कादायक ! आधी पोटच्या पोरीचा केला खून नंतर बापानेही संपवले जीवन | पुढारी

धक्कादायक ! आधी पोटच्या पोरीचा केला खून नंतर बापानेही संपवले जीवन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आधी पोटच्या मुलीला संपवुन नंतर बापाने स्वतःलाही संपवले. ही घटना धक्कादायक मंगळवारी (दि. १९) पहाटे पाचच्या सुमारास थेरगाव येथे उघडकीस आली. नंदिनी बेदरे (वय ८) आणि भाऊसाहेब बेदरे (रा. गुरू नानक नगर, थेरगाव) अशी मृत्यू झालेला बाप लेकींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब बेदरे यांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या.

पहाटे पाचच्या सुमारास माहेराहून आल्यानंतर त्यांनी हॉलमध्ये मुलीचा आणि आपल्या नवऱ्याचा मृतदेह दिसून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी बापाने आधी मुलीचा खून करून नंतर स्वतःला देखील संपवल्याची माहिती अमोर आली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांना घटनास्थळी जीवन संपवल्याची चिठ्ठी मिळून आली आहे. जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे यामध्ये नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button