prakash raj
prakash raj

Prakash Raj : ४२० करणारे ४०० पारबद्दल बोलताहेत, अभिनेते प्रकाश राज यांचे भाजपवर टीकास्त्र

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणताही राजकीय पक्ष निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करतो, तर ते 'अहंकारी' दर्शवतो. (Prakash Raj) मग तो काँग्रेस असो वा इतर कोणताही पक्ष! प्रकाश राज चिक्कमंगळूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपचे नाव न घेता प्रकाश राज यांनी रविवारी सांगितलं की, ज्यांनी ४२० (फसवणूक) केलं आहे, ते आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ४०० जागा जिंकण्याबद्दल बोलत आहेत. (Prakash Raj)

अभिनेते प्रकाश राज म्हणाले की, आता याची कोणतीच शक्यता नाही की, लोकशाहीमध्ये कोणताही एक पक्ष ४०० वा अधिक जागा जिंकू शकेल.

काय म्हणाले होते मोदी?

पीएम मोदी यांनी ५ फेब्रुवारी रोजी राज्यसभेत म्हटलं होतं की, एनडीए ४०० हून अधिक जागा मिळवत सत्तेत वापसी करेल. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाचा उत्तर देत पीएम मोदींनी म्हटले होते की, आमचा तिसरा कार्यकाळ अधिक दूर नाही. जास्तीत जास्त १०० ते १२५ दिवस शिल्लक राहिले आहेत. 'अबकी बार, ४०० पार'. खडगेजींनी देखील असे म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news