अधिक माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील खरकाटे कुटुंबावर नियतीने आघात केला आहे. येथील रतिराम खरकाटे हे वयोवृद्ध असल्याने दि.१७ मार्च रोजी दुपारी त्याचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रम दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नियोजित होते. दरम्यान, वडिलांची अंतविधी काढण्यात तयारीत असताना मुलगा सहादेव खरकाटे याला घरीच अचानक चक्कर आला आणि तो खुर्चीवरून खाली पडला. इकडे वडिलांची अंतयात्रा काढण्याची तयारी तोच मुलगा चक्कर येऊन पडल्याने तत्काळ त्याला लाखांदूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दवाखान्यात उपचारादरम्यान त्या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इकडे मुलाला दवाखान्यात दाखल केले असताना तिकडे वडिलांची अंतयात्रा निघाली.