निरा देवघरच्या वीजनिर्मिती केंद्रातून 750 क्युसेक विसर्ग

निरा देवघरच्या वीजनिर्मिती केंद्रातून 750 क्युसेक विसर्ग

भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : निरा देवघर धरण 90 टक्के भरले असून, या धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून 750 क्युसेकने पाण्याचा विसर्ग निरा नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन निरा देवघर पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. निरा देवघर धरण क्षेत्रात पावसाची संततधार मागील 15 दिवसांपासून सुरू आहे. धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून, धरणात 90 टक्के पाणीसाठा झाला आहे. पुढील काळात संततधार पाऊस सुरू राहिल्यास लवकरच धरण 100 टक्के भरण्याची आशा आहे.

संततधार पावसामुळे निरा देवघर धरणातील पाणीपातळी दिवसेंदिवस वाढत चालल्याने धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून 750 क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये बुधवारी (दि. 2) सोडण्यात आले आहे. यामुळे सहा मेगावॅट वीजनिर्मिती 24 तासांत होणार असून, पावसाच्या तीव—तेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी-अधिक बदल होऊ शकतो. विसर्ग सुरू केल्याने नदीपात्रात कोणीही उतरू नये, तर नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन पुणे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news