शेटफळगडे : विहिरीत गाडलेल्या मजुरांपैकी अद्याप एकही मजूर सापडला नाही | पुढारी

शेटफळगडे : विहिरीत गाडलेल्या मजुरांपैकी अद्याप एकही मजूर सापडला नाही

शेटफळगडे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीत गाडल्या गेलेल्या चार मजुरांपैकी अद्याप पर्यंत कोणीही सापडलेले नाही. मंगळवारी रात्रीपासून ‘एनडीएफआर’चे पथकासह सरकारी यंत्रणा, स्थानिक स्वयंसेवक शोध घेत आहेत. गुरूवार सकाळपासून मोठ्या क्रेनच्या साहाय्याने विहिरीत साठलेला ढिगारा काढण्याचे काम अंतिम करण्यासाठी एनडीआरएफ पथक छोटा पोकलेन सह पोचले आहे. तीन दिवस झाले तरी अद्याप मजूर सापडले नसल्याने नातेवाईक व प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांची बाचाबाची झाली. नातेवाईकांना शांत करून पुन्हा काम सुरु झाले आहे. अजून एकही मजूर सापडलेला नाही.

घटनास्थळी बारामती प्रांताधिकारी, इंदापूरचे तहसीलदार, बारामतीचे डी वाय एस पी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी उपस्थित आहे. याचबरोबर तालुक्यातील विविध पक्षांचे राजकीय नेते मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी सकाळपासून हजर आहेत.

हेही वाचा

पुणे : मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचा मार्ग मोकळा

रिंगरोडला गती; 8 हजार शेतकर्‍यांची सहमती

द्राक्षबागांसाठी प्लाास्टिक कव्हरचा 8 जिल्ह्यांत प्रकल्प

Back to top button