पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी संगमवाडी येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून, स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 2 मार्च) होणार आहे. संगमवाडी येथील स. नं. 52 पार्ट, 54 पार्ट येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची समाधी आहे. या ठिकाणी लहुजींचे स्मारक करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती.
त्यानुसार महापालिकेने या ठिकाणी स्मारक साकारण्यासाठी आराखडा तयार करून निविदा काढली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. हे भूमिपूजन शनिवारी आयोजित केले असून, या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, राज्यसभा सदस्या अॅड. वंदना चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा