रायगडावरील राजकीय आखाड्याचा निषेध : नामदेवराव जाधव | पुढारी

रायगडावरील राजकीय आखाड्याचा निषेध : नामदेवराव जाधव

पुणे : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रायगड किल्ल्यावर राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याकडून राजकीय आखाडा भरविण्यात आला होता. ही भूमी पवित्र करण्यासाठी रायगड किल्ल्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती इतिहासकार नामदेवराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. जाधव म्हणाले, रायगडवर केवळ छत्रपती श्रीशिवाजी महाराजच पालखीतून आगमन करत असत.

मात्र, शरद पवार यांनी पालखीतून येत छत्रपतींचा अपमान केला आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड आदी व्यक्ती मेघडंबरीवर चढले होते. हा सर्व प्रकार निंदनीय असून, त्यांनी राज्यातील मराठ्यांची जाहीर माफी मागावी. त्याचबरोबर शनिवारी लाखो मराठा कार्यकर्त्यांसह सह्याद्री खोर्‍यातील सर्व नद्यांचे पाणी आणि गोमूत्र यांसह रायगड किल्ल्याचे शुद्धीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

23 मार्चला पवारांच्या घरावर मोर्चा काढणार

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे शरद पवारच आहेत. ज्या-ज्या वेळी पवार सत्तेतून बाहेर फेकले जातात, तेव्हा मराठ्यांना भडकविण्याचे काम पवार करत असतात. मात्र, सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला विसरतात. त्यामुळे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार म्हणून सर्व मराठ्यांसह दि. 23 मार्च रोजी बारामतीतील पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याचे नामदेवराव
जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button