Kolhapuri chappal : कोल्हापुरी चप्पलला मिळाला क्यूआर कोड

Kolhapuri chappal : कोल्हापुरी चप्पलला मिळाला क्यूआर कोड
Published on
Updated on

मुंबई : अतिशय जुनी आणि पिढीजात ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल म्हणजे कोल्हापूरची शान आहे. मात्र, असे असले तरी बाजारात बोगस कोल्हापुरी चप्पलचा सुळसुळाट वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी लिडकॉमने नवा प्रयोग राबवून कोल्हापुरी चपलांना 'क्यूआर' कोड दिला आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चपलेत छोटी चीप बसवली असून चपलेला मोबाईलने स्कॅन करताच त्या चपलेची संपूर्ण माहितीच उपलब्ध होते. त्यामुळे आता मोबाईलच्या एका क्लिकवर कोल्हापुरी चप्पल असली की नकली हे सहज ओळखता येणार आहे. चपलांमध्ये असे तंत्रज्ञान जगात प्रथमच वापरले गेले आहे.

लग्नकार्यात एरवी शेरवानी आणि सुटाबुटाच्या प्रेमात पडणारी तरुणाई कोल्हापुरी चप्पलल्या पेहरावात दिसू लागली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या चप्पलची मागणी वाढू लागली आहे. तथापि, ग्राहकांना अस्सल आणि दर्जेदार चांगली कोल्हापुरी चप्पल मिळावी यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत.

मंत्रालयात प्रदर्शनाचे आयोजन

महामंडळाच्या वतीने कोल्हापुरी चपलांचे प्रदर्शन मंत्रालयात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित नवीन कोल्हापुरी चपला विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान इमरटेक इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीने विकसित केले आहे. ही चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ती कुठे आणि कोणत्या कारागिराने बनवली, चामडे कुठून आणले, ते कोणत्या प्राण्याचे आहे, आदी सर्व गोष्टींची माहिती ग्राहकांना मिळते. ही माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली. विशेष म्हणजे चप्पल विकत घेतल्यानंतर संगणकाच्या आधारे संबंधित ग्राहकाचे नावही त्या चीपमध्ये समाविष्ट केले जात असून या माहितीमध्ये कोणालाही फेरबदल करता येत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news