एका विचाराच्या सत्तेने पुणेकरांचे आयुष्य सुधारले नाही : सुप्रिया सुळे

एका विचाराच्या सत्तेने पुणेकरांचे आयुष्य सुधारले नाही : सुप्रिया सुळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डोणजे हे ग्रामीण भाग असला तरी शहराचाच भाग झाला आहे. या भागात कचरा व्यवस्थापन, मैला शुद्धीकरण प्रकल्प करणे आवश्यक आहे. महागाई वाढली, पुण्याचं ट्रॅफिक वाढलं, पाण्याचा प्रश्न , विजेचा प्रश्न सुटला नाही. २०० आमदार, ३०० खासदार असून भाजपने कोणते मोठे प्रश्न सोडवले? भ्रष्टाचार तर ऑफिसीयल केला आहे. एका विचाराची पुण्यात सत्ता असून देखील पुणेकरांचे आयुष्य सुधारले नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. वारजे येथील पुणे महानगरपालिकेच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची पाहणी रविवारी (दि.१८) खासदार सुळे यांनी केली.

त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, डोणजे पासून खडकवासला धरणापर्यंत पाण्यामध्ये प्रदूषण वाढत चालले आहे. मी वारंवार सर्वांकडे याबाबत मागणी केली आहे. पुणे महापालिकेने हवे तेवढं लक्ष याकडे दिलेलं नाही. पण या भागात जर प्रदूषण वाढले याचे दूरगामी परिणाम सर्व पुण्यातील नागरिकांवर होणार आहेत. पुणे महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित काम झालेलं नाही. प्रदूषण वाढत आहे. महापालिकेने एक वेळ निश्चित करून काम करावे. आरक्षणाच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. धनगर समाजाला आरक्षण देऊ फडणवीस बारामती मध्ये येऊन बोलले होते. पण ते अजूनपर्यंत ही मिळालेले नाही. मनोज पाटील यांचे आंदोलन उभ्या राज्याने पाहिलं आहे. मराठा समाजाला त्यांना अपेक्षित असे आरक्षण मिळालेले नाही.

सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने चिन्ह हिसकावून घेतलं या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. संस्थापकीय अध्यक्ष शरद पवार आहेत त्यामुळे पक्ष त्यांनाच मिळायला हवा. इथल्या अदृश्य शक्तीने संविधानाचे चिरफाड केली आहे. सुनेत्रा पवार यांच्याविषयी त्या म्हणाल्या, हा भातुकलीचा खेळ नाही. माझं काम एका जागेवर आणि नाती दुसरीकडे. माझी नाती पवार, सुळे यांच्या पुरते मर्यादित नाही. अनेक नाती प्रेमाचे, विश्वासाचे असतात. नाती नेहमी राहतील पण माझी एक वैचारिक बैठक आहे. माझी लढत वयक्तिक नाही वैचारिक आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news