पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये एका रेल्वे डब्याला भीषण आग..!

पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये एका रेल्वे डब्याला भीषण आग..!
Published on
Updated on

पुणे :  काल मध्यरात्री 1:58 वाजता (दिनांक 13 फेब्रुवारी 2024 ) पुणे रेल्वे जंक्शन येथे रेल्वेच्या डब्बयाला आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून दलाकडून नायडू, येरवडा, बी.टी.कवडे रोड अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वाॅटर टँकर अशी एकुण चार वाहने तातडीने रवाना करण्यात आला होता.

घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी क्वीन्स गार्डनच्या पाठीमागील बाजूकडे (कॉम्प्रेसर रुमनजीक) क्रमांक चार रेल्वे मार्ग येथे बऱ्याच दिवसापासून उभ्या स्थितीत असलेल्या रेल्वेच्या तीन डब्ब्यापैंकी मधल्या एका डब्ब्याला आग लागल्याचे निदर्शनास येताच तेथील विद्युत विभागाशी संपर्क साधून विद्युत प्रवाह बंद करण्याच्या सूचना देत जवानांनी लगेच पाण्याचा मारा सुरू करत, आतमध्ये कोणी प्रवासी अथवा रेल्वे कर्मचारी नसल्याची खात्री केली व सुमारे अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवत पुढे कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवत रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने इतर दोन डबे सुरक्षित ठिकाणी नेत धोका दूर केला.

त्यानंतर आगीवर सतत पाण्याचा मारा सुरू ठेवत आग पुर्ण विझवली. दलाची मदत पोहोचण्यापुर्वी रेल्वे कर्मचारी यांनी उपलब्ध असणारया छोट्या नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझवण्याचे प्रयत्न केले. घटनास्थळी रेल्वे पोलिस विभागाची मदत उपस्थित होती. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. सदर घटनेत कोणी जखमी वा जिवितहानी नसून जळालेल्या एका डब्ब्याचे पुर्ण नुकसान झाले आहे. यावेळी अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे व जवळपास वीस जवानांनी आग विझवण्यात सहभाग घेतला. याबाबत रेल्वेची वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणाले, पुणे यार्ड परिसरात डब्यांना लागलेली आग, कशामुळे लागली याचे अद्याप पर्यंत कारण समजलेले नाही. मात्र, या घटनेची चौकशी सुरू असून, लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news