Mukesh Ambani : आता मुकेश अंबानी विकणार ‘पान पसंद’! | पुढारी

Mukesh Ambani : आता मुकेश अंबानी विकणार ‘पान पसंद’!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भारत आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी ( Mukesh Ambani ) यांनी आणखी एक कंपनी विकत घेतली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची एफएमसीजी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने रावळगाव शुगर फार्मचा मिठाई व्यवसाय खरेदी केला आहे. हा करार 27 कोटी रुपयांना झाला आहे. करारानुसार या कंपनीचे ट्रेडमार्क, पाककृती आणि बौद्धिक संपदा हक्क आता रिलायन्सकडे आले आहेत.

संबंधित बातम्या 

रावळगाव यांनी शुक्रवारी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी 1933 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रावळगाव गावात साखर कारखान्याची स्थापना केली. 1942 मध्ये या कंपनीने रावळगाव ब्रँड अंतर्गत टॉफी बनवण्यास सुरुवात केली. या कंपनीचे पान पसंद, मँगो मूड आणि कॉफी ब्रेक असे नऊ ब्रँड आहेत.

संघटित आणि असंघटित उद्योगधंद्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे रावळगावचा बाजारपेठेतील हिस्सा कमी होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळेच कंपनीने आपला मिठाई व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला. ( Mukesh Ambani )

Back to top button