Servant of India Society : बिंग फुटू नये म्हणून डॉ. रानडेंनी लपविली स्वतःची अर्हता

Servant of India Society : बिंग फुटू नये म्हणून डॉ. रानडेंनी लपविली स्वतःची अर्हता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे अपत्य म्हणून गोखले इन्स्टिट्यूटची निर्मिती झाली तेव्हापासून सगळे कुलगुरू आणि संचालक यांची माहिती सार्वजनिक आहे. मात्र डॉ. अजित रानडे यांनी स्वतःचा बायोडाटा अजूनही सादर केला नाही.
ही खळबळजनक बाब माहिती अधिकारातील तपशिलात उघडकीस आली आहे. त्यांच्या शैक्षणिक अर्हतेची पोलखोल होईल म्हणून डॉ.रानडे हे लपत-छपत कुलगुरूपद सांभाळत आहेत.

माहितीच्या अधिकारात सार्वजनिक, शैक्षणिक तथा प्रशासनाबाबत माहिती देण्याच्या तरतुदी आहेत. मात्र मार्च 2023 मध्ये केलेल्या माहिती अधिकारातील अर्जाला उत्तर देताना त्यात बायोडाटा देण्याचे गोखले इन्स्टिट्यूटने टाळले आहे. कारण कुलगुरू डॉ.गोखलेंना त्यांचे बिंग फुटू नये म्हणून स्वतःची अर्हता लपवायची आहे. त्यामुळेच ते संस्थेत भेटावयास गेलो तर कुणालाही भेट देत नाही. सतत टाळाटाळ करतात.

कुलगुरू डॉ.रानडे यांनी मुखोपाध्याय ह्या महिला प्राध्यापिकेला अभय दिले. याबाबत बोभाटा होताच. त्यांचा राजीनामा घेण्यात आला. माजी कुलसचिव रथ यांच्या पत्नीला शैक्षणिक पात्रता नसताना परिचारिका म्हणून नियुक्ती दिली. त्यामुळे कुलगुरूसारख्या जबाबदार पदाचा वापर किती बेजबाबदार पध्दतीने डॉ. रानडे करीत आहे हेच या सर्व घटनांवरून स्पष्ट होते. धर्मादाय आयुक्तांकडे दाखल असलेल्या बदल अर्जप्रकरणी युक्तिवाद करण्याची तारीख लवकरच कळेल, अशी माहिती अ‍ॅड. राजेश ठाकूर यांनी दिली.

-प्रवीणकुमार राऊत, हरकतदार.

लपत-छपत कारभार करणारे कुलगुरू

सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी सोसायटीचे अध्यक्ष दामोदर साहू व सचिव मिलिंद देशमुख यांच्या मुलांना संस्थेचे सदस्य करून घेण्यासाठी डॉ. राजीव कुमार यांना कुलपती केले व त्यांनी रानडे यांना कुलगुरू केले. मात्र, प्रा. मुरलीकृष्णा यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार रानडे कुलगुरू होऊ शकत नाही ही माहिती उघड केली. त्यामुळे डॉ. अजित रानडे यांच्या वागणुकीमध्ये संशयात्मक बदल जाणवत आहेत. त्यांच्या वैयक्तिक घडामोडी लपवून ठेवण्यासाठी त्यांनी अतिरिक्त कर्मचारीवर्ग वाढवून घेतला. त्याचा अतिरिक्त आर्थिक बोजा व्यवस्थापक मंडळावर पडतो आहे.

फीमध्ये तब्बल 45 टक्के वाढ

विद्यार्थांच्या शुल्कात तब्बल 45 टक्के वाढ करून डॉ. रानडे यांनी विद्यार्थ्यांची फीद्वारे आर्थिक लूट सुरू केली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या पालकांवर पडतो आहे. स्वतः विद्यापीठ अनुदान आयोगाची फसवणूक करून कुलगुरू झाले. त्या पदाचा गैरवापर करून गोखले इन्स्टिट्यूटसारख्या पवित्र शैक्षणिक संस्थेचा नावलौकिक धुळीस घालण्याचा घाट मिलिंद देशमुख, अध्यक्ष दामोदर साहू यांच्यामार्फत सुरू आहे.

माहिती दडवणारे हे कसले कुलगुरू

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे किशोर कांबळे यांनी सामाजिक दायित्व म्हणून डॉ. रानडे यांच्याबद्दल कुलगुरू पदासाठीच्या प्रक्रिया
आणि शैक्षणिक पात्रताबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली. त्याबाबत गेल्या अकरा महिन्यांपासून नेमकी माहिती देण्याचे टाळले. त्यामुळे डॉ. अजित रानडे हे 'जुमलेबाज' कुलगुरू असल्याचे सिद्ध होत आहे.

नियमांची खुलेआम पायमल्ली

सार्वजनिक, शासकीय आर्थिक लाभ घेणार्‍या प्रत्येकाला स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेचा तपशील देणे अनिवार्य आहे. मात्र, डॉ. रानडे यांनी स्वतः चा बायोडाटा देण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाला बंदी घातली आहे. ही बाब माहितीच्या अधिकार अर्जाद्वारे समोर आली आहे. दामोदर साहू यांच्या मुलाला व सचिव मिलिंद देशमुख यांनी चिन्मय देशमुख या मुलाला सदस्य होता यावे म्हणून डॉ. अजित रानडे यांना खुलेआम कायद्याची पायमल्ली करण्याची मुभाच दिली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news