पुणेकरांचा असाही फंडा; सिग्नलची पूजा करून केला वाहतूक कोंडीचा निषेध | पुढारी

पुणेकरांचा असाही फंडा; सिग्नलची पूजा करून केला वाहतूक कोंडीचा निषेध

वारजे : पुढारी वृत्तसेवा : शिवणे परिसरातील गणपती माथा येथे शिंदे पुलापर्यंत एनडीए मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. यामुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने (आप) शिंदे पूल येथे बंद असलेल्या सिग्नलची पूजा करून प्रशासनाचा निषेध केला आहे. या आंदोलनाप्रसंगी नीलेश वांजळे म्हणाले, ‘या रस्त्यावर दररोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे.

गेल्या पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा अद्यापही बंद आहेत. ही यंत्रणा कार्यान्वित झाली, तर या रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास मदत होईल.’ या वेळी ‘आप’च्या शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा भोसले, प्रभाग अध्यक्ष अभिजित वाघमारे, गोपीनाथ जोशी, पुंडलिक कांबळे, विक्रम भगत, ऋषिकेश काकडे, अनिल नवगिरे, उर्मिला वांजळे, संदेश पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button