खेड-शिवापूर येथील उड्डाणपुलाचे काम सुरू | पुढारी

खेड-शिवापूर येथील उड्डाणपुलाचे काम सुरू

खेड-शिवापूर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर येथील अनेक दिवसांपासून रखडलेले उड्डाणपुलाचे काम अखेर दै.’पुढारी’च्या वृत्ताची दखल घेत संबंधित प्रशासनाने सुरू केल्याने स्थानिकांसह शिवभूमी शिक्षण मंडळ, भागातील पालक वर्गाने दै.’पुढारी’चे व शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांचे आभार मानले आहेत. या ठिकाणी तब्बल चौदा वर्षे उड्डाणपुलाचे काम रखडले होते, त्यामुळे शिवभूमी विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुणे-सातारा रस्ता जीव मुठीत धरून ओलांडावा लागत होता. स्थानिकांना व मुख्यतः खेड- शिवापूरमधील नागरिकांना गावामध्ये जाण्यासाठी महामार्ग पार करावा लागत होता.

यावेळी कधीही मोठी दुर्घटना घडू शकते अशी स्थिती असल्याने उड्डाणपूल व्हावा या मागणीची प्रसिद्धी वेळोवेळी दै.’पुढारी’च्या माध्यमातून करण्यात आली होती, त्याचेच फळ आम्हाला आज उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने पाहायला मिळत असल्याचे स्थानिकांनी व विद्यार्थ्यांनी सांगितले.

संभाव्य धोका पाहता मी अनेकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारीवर्गाशी बोललो,त्याचप्रमाणे त्यासाठी संबंधित प्रशासनाशी पत्र व्यवहार करून त्याचा पाठपुरावा करीत होतो. शेवटी शिंदे सरकार आल्यानंतर या उड्डाणपुलाला खर्‍या अर्थाने संमती मिळून काम सुरू झाले आहे.
               -रमेश कोंडे, पीएमआरडीए संचालक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख

 

Back to top button