

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फटाक्यांसारखा आवाज वाढवून शहराची शांतता भंग करणार्या व ध्वनी प्रदूषण वाढविणार्या तब्बल 571 बुलेटसह इतर आवाज करणार्या दुचाकी वाहतुक विभागाने जप्त केल्या. त्यानंतर जप्त दुचाक्यांचे सायलेन्सर वाहतुक विभागाच्या समोरील मैदानात बुलडोजरखाली चेंगरून नष्ठ केले. गुन्हेगारीनंतर आता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या कारवाई मोर्चा वाहतूक नियमभंग करणार्यांकडे वळविला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्यांदा शहरातील नामांकित गुंडांना व त्यांच्या नंबरकार्यांना पोलिस आयुक्तालयात गोळा करून गुन्हेगारी कारवायात सहभागी न होण्याबाबत दम भरला होता. दुसर्या दिवशी सलग शहरातील अमंली पदार्थ तस्करीत व पिस्तुल विक्रीत सक्रीय असलेल्या गुन्हेगारांना एकत्र करून त्यांनाही गुन्ह्यात सहभागी झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
याचेच पुढचे पाऊल उचलत वाहतुक विभागाने शहरात फटाक्यांसारखा आवाज काढणार्या बुलेट, पल्सर सारख्या गाड्या वाहतूक विभागाने जप्त करून येरवडा येथील कार्यालयासमोर उभ्या केल्या. यावेळी गॅरेजमधील कर्मचार्यांच्या साह्याने या बुलेटचे सायलेन्सर दुचाकीपासून वेगळे करण्यात आले. त्यांनतर एक मोठा बुलडोजर मागवून ह्या दुचाकीचे सायलेन्सर या बुलडोजर खाली चिरडण्यात आले. यावेळी तब्बल 571 गाड्यांचे सायलेन्सर बुलडोजर खाली चिरडण्यात आले. लाखो रुपयांचे सायलेन्सर यावेळी नष्ठ करण्यात आले. वाहतुकीचे नियमभंग कराल तर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराच दिला आहे.
हेही वाचा