आस्था एक्सप्रेसमध्ये मोबाईलचा स्फोट; पिंपरी येथे प्रवाशांची धांदल | पुढारी

आस्था एक्सप्रेसमध्ये मोबाईलचा स्फोट; पिंपरी येथे प्रवाशांची धांदल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून अयोध्येला मार्गस्थ झालेल्या आस्था एक्सप्रेसमध्ये मंगळवारी (दि. 6) रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्यादरम्यान एका प्रवाशाने चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे भीती निर्माण होऊन प्रवाशांची एकच धांदल उडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली आस्था एक्सप्रेस पुणे स्थानकामधून रात्री सात वाजून पंचवीस मिनीटांनी सुटली.

पिंपरी स्थानकाजवळ आल्यानंतर अचानक प्रवाशांनी चेन ओढली. त्यामुळे काही मिनिटांसाठी गाडी थांबली होती. मात्र, ही चेन का आणि कोणत्या प्रवाशाने ओढली, याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली नाही. स्थानकातील प्रवाशाने जळता मोबाईल या गाडीत एका महिलेच्या अंगावर फेकल्याने ती जखमी झाल्याचे बातमीदेखील व्हायरल होत आहे. मात्र रेल्वे प्रशासन याबाबत प्रसिध्दीमाध्यमांना ठोस माहिती देत नसल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा

Back to top button