PM मोदी खुल्‍या प्रवर्गातील, त्‍यांनी जात लपवली : राहुल गांधींचा आरोप | पुढारी

PM मोदी खुल्‍या प्रवर्गातील, त्‍यांनी जात लपवली : राहुल गांधींचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्‍म इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) झालेला नाही. यांचा जन्‍म खुल्‍या प्रवर्गातील आहे. त्‍यांनी जातीबाबत खोटी माहिती दिली आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (दि.८) केला. ( PM Modi belongs to general category : Rahul Gandhi alleges  )

ओडिशातील झारसुगुडा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधी म्‍हणाले की, “पंतप्रधान मोदींचा जन्म ओबीसी प्रवर्गात झालेला नाही. भाजपने 2000 साली समाजाला ओबीसीचा टॅग दिला होता. त्यांचा जन्म सर्वसामान्य जातीत झाला आहे. मोदींचा जन्‍म ओबीसीमध्‍ये झालेला नव्‍हता. त्‍यामुळे ते कधीही देशात जातनिहाय जनगणना होऊ देणार नाहीत, असा दावाही त्‍यांनी केला.

राहुल गांधी यांची न्याय यात्रा ओडिशातील झारसुगुडा येथील जुन्या बस स्टँड महात्मा गांधी रस्त्यावरून निघाली. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा काल, बुधवारी झारखंडहून ओडिशात पोहोचली हाेती. पहिल्या दिवशी त्यांची राउरकेलामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी राउरकेलाच्या मध्यभागी असलेल्या गांधी चौकात केवळ केंद्र सरकारसह राज्‍य सरकारवरही हल्‍लाबोल केला. आज भारत जोडो न्याय यात्रा ओडिशामार्गे छत्तीसगडमध्ये दाखल होईल.

Back to top button