Pune News : पुर्व हवेलीच्या अप्पर तहसीलदारपदी तृप्ती कोलते | पुढारी

Pune News : पुर्व हवेलीच्या अप्पर तहसीलदारपदी तृप्ती कोलते

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा : हवेली तहसीलदार कार्यालयाचे विभाजन होऊन नवीन स्थापन झालेल्या पुर्व हवेलीतील लोणी काळभोर अप्पर तहसिल कार्यालयाच्या तहसीलदार पदी तृप्ती कोलते यांची नियुक्ती करण्यात आली कोलते या लोणी काळभोर अप्पर तहसिल कार्यालयाच्या प्रथम तहसीलदार आहेत. महाराष्ट्र शासनाने हवेली तालुक्याचे तहसील कार्यालयाचे विभाजन करून २ नोव्हेंबर २०२३ रोजी लोणी काळभोर येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करणे बाबत शासन निर्णय काढण्यात आला.

शासन निर्णय आणि अप्पर तहसीलदार व महसूल सहाय्यक पद निर्माण केले तसेच शासन राजपत्र सुद्धा ६ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केले यानंतर ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने उपसचिव अजित देशमुख यांनी कोलते यांच्या नियुक्तीचे आदेश पारीत केले. कोलते या यापूर्वी वेल्हा, वाई, मुळशी येथे नायब तहसीलदार म्हणून काम केले तर सोलापूर, पुणे शहर, हवेली येथे तहसीलदार म्हणून काम केले मुळशी येथे कार्यरत असताना राज्यातील अभिलेख संगणीकरणाचा पायलट प्रकल्पाची जबाबदारी यशस्वी पुर्ण केली यावेळी चौदा लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग व संगणीकरण केले कोलते या सध्या मुंबई येथील रस्ते विकास महामंडळात तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या तेथून लोणी काळभोर अप्पर तहसिल कार्यालयात त्यांची बदली झाली.

हेही वाचा

Back to top button