निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकार्‍यांचे खांदेपालट! | पुढारी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकार्‍यांचे खांदेपालट!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील 18 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात पुण्याचे रजा राखीव विभागाचे उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे वारे वाहत होते. त्यात जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचा समावेश असून, अखेर शासनाच्या उपसचिवांनी बदल्यांचे आदेश जारी केले.

त्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील रजा राखीव विभागाचे उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांची सोलापूर भूसंपादन क्र. 1 येथे बदली करण्यात आली. तर सोलापूर भूसंपादन क्र. 1 च्या उपजिल्हाधिकारी डॉ. रेखा विजयसिंह साळंके यांची पुणे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 26 येथे सिद्धार्थ भंडारे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणार्‍या जागी करण्यात आली आहे. पुणे जिल्हा पुनर्वसन अधिकारी विवेक जाधव यांची अमरावती महसूल उपजिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली.

पीएमआरडीएच्या उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांची सोलापूर निवासी उपजिल्हा धिकारीपदी, तर डॉ. रामदास जगताप यांची अहमदनगर येथे रोहयो पदावर बदली करण्यात आली. पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी यांची अभिजित पाटील यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या सोलापूर भूसंपादन क्र. 11 येथे बदली करण्यात आली. कृष्ण खोरे विकास महामंडळचे उपजिल्हाधिकारी पल्लवी सोळंके यांची पुणे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 4 येथे रोहिणी आखाडे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या ठिकाणी बदली करण्यात आली.

डॉ. सीमा होळकर यांची बदली

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांच्या बदलीने होणार्‍या रिक्त पदावर जयश्री आव्हाड यांची अहमदनगर येथून बदली करण्यात आली. पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांच्या बदली रिक्त होणार्‍या पदावर प्रशांत आवटे यांची तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा

Back to top button