Weather Update : पुणे 12.6 अंश; नीचांकी तापमान | पुढारी

Weather Update : पुणे 12.6 अंश; नीचांकी तापमान

पुणे : राज्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. दरम्यान, शनिवारी पुणे शहरात 12.6 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात 9 फेब्रुवारीपर्यंत तापमानात चढ-उतार दिसतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून, पश्चिमी चक्रवाताचा जोर सलग दीड महिन्यापासून सुरूच आहे. दिल्लीत विक्रमी किमान तापमानाचा गेल्या 13 वर्षांतील विक्रम यंदाच्या हिवाळ्यात झाला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवला.

हेही वाचा

Back to top button