अश्लिल चित्रीकरण : नर्सचे अंघोळ करताना चित्रीकरण; सुरक्षा गार्डला अटक | पुढारी

अश्लिल चित्रीकरण : नर्सचे अंघोळ करताना चित्रीकरण; सुरक्षा गार्डला अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा

येथील ‘आयबी गेस्ट हाऊस’मध्ये वास्तव्यास असलेल्या आणि नामांकित सरकारी रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कर्तव्यावर असलेल्या महिला परिचारिकेचे आंघोळ करतानाचे फोटो आणि चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेस्ट हाऊसच्या सुरक्षारक्षकानेच हे संतापजनक कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे. (अश्लिल चित्रिकरण)

याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली असून, अशोक तुकाराम चव्हाण (26, रा. आयबी गेस्ट हाऊस) असे त्याचे नाव आहे. याबाबत सदर ३६ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.22) घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ह्या सरकारी रुग्णालयात परिचारीका म्हणून काम करतात. तर आरोपी चव्हाण हा महाराष्ट्र सुरक्षा बलाचा कर्मचारी आहे. त्या सध्या कोरोना ड्यूटीवर असल्याने त्यांची आयबी गेस्ट हाऊस येथे राहण्याची सोय करण्यात आली आहे. (अश्लिल चित्रिकरण)

सोमवारी त्या कामावरून गेस्ट हाऊसमध्ये आल्या. कोरोना ड्यूटी करून आल्याने त्या आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या होत्या. त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्या बाथरूमच्या खिडकीजवळ येत त्यांचे आंघोळ करतानाचे फोटो काढले.
महिलेला याबाबत शंका आल्याने त्यांनी तात्काळ बाहेर येऊन पाहणी केली. मात्र, त्यांना कुणी मिळून आले नाही. (अश्लिल चित्रीकरण)

अश्लिल चित्रीकरण प्रकरणी नर्सने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या रुमबाहेरील परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता सुरक्षारक्षक आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चित्रीकरण केल्याची कबूली दिली. यानूसार सुरक्षारक्षक चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. गार्डच्या या कृत्याबद्दल संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button