सचिन तेंडुलकर विकेटकिपर श्वानावर झाला फिदा | पुढारी

सचिन तेंडुलकर विकेटकिपर श्वानावर झाला फिदा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा सोशल मीडियावर चांगलाच एक्टिव्ह असतो. तो अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असणारे व्हिडिओ शेअर करत असतो. आताही त्याने एका श्वानाचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला.

सहसा श्वानांना चेंडू बरोबर खेळण्यात विशेष आनंद वाटत असतो. असाच एक श्वान भन्नाट विकेट किपिंग करत असल्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खुद्द सचिन तेंडुलकर याने देखील आपल्या ट्विटर अकाऊंवर शेअर केला.

या व्हिडिओत एक मुलगी गल्लीत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत होती. ती मुलगी बॅटिंग करत असताना. एका मुलाने तिला चेंडू टाकला. दरम्यान, या व्हिडिओत श्वानाचे आगमन होते. त्याचवेळी बॅटिंग करणारी मुलगी चेंडू टोलवण्यात चुकते. चेंडू विकेटच्या मागे येत असतो इतक्यात श्वान तेथे येतो आणि विकेट किपरची भुमिका बजावत चेंडू क्षणार्धात आपल्या तोंडात पकडतो. हा श्वान चेंडू पकडल्यानंतर तो लगेचच बॉलरकडेही परत देतो आणि पुन्हा विकेट किपिंग करण्यासाठी सज्ज होतो.

या व्हिडिओला सचिन तेंडुलकरने कॅप्शन देत म्हणला की, ‘हा व्हिडिओ मला एका मित्राकडून मिळाला आहे. श्वानाने चेंडू अत्यंत कौशल्यपूर्ण विकेट किपिंग केली आहे. आपण विकेट किपर पाहिले आहेत, फिल्डर पाहिले आहेत, ऑल राऊंडरही पाहिले आहेत. पण, याला तुम्हा काय म्हणणार?’

Back to top button