महत्त्वाची बातमी ! तलाठी परीक्षेतील उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर

महत्त्वाची बातमी ! तलाठी परीक्षेतील उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर

Published on

 पुणे : पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित तलाठी परीक्षेतील गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सरिता नरके यांनी कळविली आहे. ही यादी उमेदवाराना पाहण्यासाठी भूमी अभिलेख च्या संकेतस्थळवर उपलब्ध आहे. तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन टप्प्यात 57 सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून दहा लाख 41 हजार 713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. यापैकी आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली.

संबंधित बातम्या :

परीक्षेची उत्तरसूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसुचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी 2831 प्रश्नांवर 16 हजार 205 आक्षेप उमेदवारांकडून नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9072 आक्षेप परीक्षा घेणार्‍या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले. त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले.

दरम्यान, परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले आहेत. मात्र, हे आरोप, दावे फेटाळत भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले. मंगळवारी रात्री उशीरा कोल्हापूर, सांगली, सातारा, संभाजीनगर, बीड, धाराशिव, हिंगोलीसह 23 जिल्ह्यांची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news