राहुल गांधीची सुरक्षा धोक्यात? मल्लिकार्जुन खर्गेंचे अमित शहांना पत्र | पुढारी

राहुल गांधीची सुरक्षा धोक्यात? मल्लिकार्जुन खर्गेंचे अमित शहांना पत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान आसाममध्ये झालेल्या संघर्षाबाबत काँग्रेसकडून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या सरकारवर शाब्दिक हल्ला सुरूच आहे. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना याबाबत पत्र लिहिले आहे. राहुल गांधींची सुरक्षा धोक्यात असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत आसाम पोलिसांवरही त्यांनी आरोप केले आहेत.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?

काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मणिपूर ते मुंबई अशी १४ जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो यात्रा आसाममध्ये पोहोचली. राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा असतानाही आसाम पोलिस मात्र बेजबाबदार राहिले. अरुणाचल प्रदेशातून काँग्रेसची यात्रा आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात परतली, तेव्हा तेथील स्थानिक अधीक्षक, जे सीएम सरमा यांचे बंधू आहेत, त्यांनी काँग्रेसच्या यात्रेवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असताना दुर्लक्ष केल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे.

Back to top button