महत्वाची बातमी : पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान लोकल गाड्या रद्द | पुढारी

महत्वाची बातमी : पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान लोकल गाड्या रद्द

पुणे ;पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या पुणे-लोणावळा विभागात इंजिनिअरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरिता रविवारी (दि. 21) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान लोकल गाड्या रद्द राहतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

अप उपनगरीय गाड्या रद्द :-

पुणे -लोणावळा (01562): 9.57 वाजता ा, पुणे -लोणावळा (01564) 11.17 वाजता, पुणे-लोणावळा (01566) : 3.00 वाजता, शिवाजीनगर- तळेगाव (01588) 3.47 वाजता, पुणे- लोणावळा (01568) : 4.25 वाजता, शिवाजीनगर- लोणावळा (01570) : 5.20 वाजता

डाऊन उपनगरीय गाड्या रद्द :-

लोणावळा-शिवाजीनगर (01559) : 10.05 वाजता, लोणावळा- पुणे (01561) : 2.50 वाजता, तळेगाव -पुणे (01589) : 4.40 वाजता, लोणावळा- शिवाजीनगर (01565) : 17.30 वाजता, लोणावळा- शिवाजीनगर (01567) : 06.08 वाजता, लोणावळा- पुणे (01569) :7.00 वाजता

मेल/एक्स्प्रेस ट्रेनचे रेग्युलेशन:-

गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस सेक्शनमध्ये 03.30 तास नियमित करण्यात येईल.

हेही वाचा

 

Back to top button