सिंधुदुर्ग : मासेमारी नौकेवर परप्रांतीय हायस्पीड नौकेचा हल्ला | पुढारी

सिंधुदुर्ग : मासेमारी नौकेवर परप्रांतीय हायस्पीड नौकेचा हल्ला

मालवण; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रात 12 ते 13 वाव खोल समुद्रात नांगरून ठेवलेल्या मालवण येथील आशा मोहन शिरसाठ यांच्या विशवेश्वर प्रसाद या बोटीला परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.हा हायस्पीड ट्रॉलर्स बोटीला धडक देऊन पळून गेला. यात शिरसाठ यांच्या बोटीचे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बोटीवरील 9 खलशी मात्र सुदैवाने बचावले.समुद्रातील या जीवघेण्या थरारामुळे मच्छिमारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेबाबत बोटीचे मालक मोहन शिरसाठ यांनी सहाय्यक मत्स्यआयुक्त कार्यालयात तक्रार दिली आहे.

मालवण येथील मोहन शिरसाठ यांची बोट शुक्रवारी मासेमारीसाठी समुद्रात गेली होती.12 वाव समुद्रात नांगरून ठरलेल्या बोटीला परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सने धडक दिली यावेळी बोटीला हादरा बसला असता बोटीतील खलाशी भयभीत झाले होते.त्यात डिझेल भरलेले 4 बॅरल होते. बोट कलंडण्याची स्थिती निर्माण झाली.खलाश्यानी बाहेर येऊन पाहिले मात्र हायस्पीड बोटीने पळ काढला. समुद्रात बुडत असलेल्या बोटीवरील 3 डिझेल भरलेले बॅरल व जाळी समुद्रात टाकण्यात आली. बोटीवरील वजन कमी करण्यात आले. खलाश्यानी मालवण येथे संपर्क साधला. मालवण येथील सुनील खंदारे व अन्य सहकारी अन्य बोटीने तातडीने समुद्रात रवाना झाले. घटनास्थळी पोहचून त्या बोटी वरील खालशी यांना आपल्या बोटीवर सुखरूप रित्या आणण्यात आले. ती बोटही बांधून एका बाजूने कलंडलेल्या स्थितीत सकाळी किनाऱ्यावर आणण्यात मोठ्या प्रयत्नातून यश आले.

अश्या स्वरूपात हायस्पीड बोटिंचा हा हल्ला कधीही होऊ शकतो तरी याबाबत राज्य शासन, गृह विभाग, सागरी सुरक्षा यंत्रणा यांनी गंभीर दखल घ्यावी. संबंधितावर कठोर करवाई व्हावी अशी आग्रही मागणी केली जात आहे.

Back to top button